Memoradum submitted to Hon Shri Dr Subhash Ji Bhamare, MP Dhule (Maharashtra)
ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती, धुळे.
धुळे जिल्हा संघटनेचे वतीने मा.राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर श्री अशोक राऊत साहेब यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली " ईपीएस पेन्शनर्स बचाओ "अभियान अंतर्गत जिल्हा संघटना, व धुळे, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील ४० पदाधिकारी यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्री सुभाषजी भामरे साहेब यांची भेट घेवून आपले निवेदन धुळे जिल्हा महिला सदस्यांद्वारे सादर केले. त्यात श्रीमती कामिनी बागले, श्रीमती भावना गिरासे व श्रीमती हिरकनताई कावडे यांचा समावेश होता.
जिल्हाध्यक्ष श्री देविसिंग जाधव यांनी १ जून २०२१ रोजी भारतभरात एक दिवसीय उपोषण केले व मा.पंतप्रधान यांना सदर प्रश्र्न सोडवून पेन्शनर्सना न्याय द्यावा यासाठी ई-मेल पाठवून आपले गा-हाणे पोहचविले असे नमूद करीत, आज आम्ही " पेन्शनर्स बचाव अभियान "अंतर्गत आमचे निवेदन आपणांस सादर करणेसासाठी येथे आलो आहोत.
त्यानूसार मा.खासदार साहेबांना निवेदनातील मुद्देनिहाय विवेचन (briefing ) केले. मा. खासदार साहेब यांनी पेन्शनर्सच्या प्रश्नावर संसदेत प्रश्न उपस्थित केला असला तरी अद्यापही त्यावर अपेक्षित निर्णय झालेला नाही, त्यामुळे पेन्शनर्सची आर्थिक कुचंबणा होत आहे. आम्हाला आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात जीवनयापना करणेसाठी सन्मानजनक पेन्शन मिळावी याकरिता आपण हा प्रश्न सातत्याने व अभ्यासपूर्ण रितीने मांडावा,अशी विनंती केली, आपण एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहात.
सांसदरत्न म्हणून आपली एक वेगळी प्रतीमा आहे असेही नमूद केले. त्यावर मा. खासदार यांनी तुमच्या आशिर्वादाने मी दुस-यांदा खासदार म्हणून निवडून आलो. सन्मानजनक पेन्शन हा तुमचा हक्क आहे त्याचबरोबर आपण निवेदनात नमूद केलेल्या ४ मुद्दे मला ज्ञात आहेत व त्यासाठी मी सदैव आपल्याबरोबर आहे. येत्या जुलै महिन्यात संसदेचे अधिवेशन अपेक्षित आहे. या प्रश्नाबाबत मी स्वत: वैयक्तिक व सामूहिक रित्या प्रयत्नशील राहील याची ग्वाही देतो.
सदर प्रसंगी मा.खासदार साहेबांनी पेन्शनर्सप्रती आदरभाव दर्शविला त्यांचे आभार मानून भेटीत सहभागी झालेल्या सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी दिलेली उपस्थिती निश्चितच अभिनंदनीय आहे परंतु भविष्यकालीन उपक्रमात देखील आपण अशीच उपस्थिती द्यावी, आपले अभिनंदन व आभार असे आवाहन करीत आजची भेट संपन्न झाली.
स्नेहांकित,
देविसिंग अण्णा जाधव जिल्हाध्यक्ष, धुळे
जे.आर सुर्यवंशी,
जिल्हा सरचिटणीस, धुळे जिल्हा.
मा.खासदार डॉ श्री सुभाषजी भामरे यांच्या भेटीप्रसंगीचे काही निवडक छायाचित्रे
0 Comments